Neha Pendse : अभिनेत्री नेहा पेंडसेने पहिल्यांदाच कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती. या महोत्सवातील तिच्या हटके लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. नुकताच नेहाने तिच्या इन्स्टावरून तिचा साडीतला नवा लूक शेअर केला आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. मराठी टेलिव्हिजनचा पडदा गाजवल्यानंतर नेहाने हिंदी टेलिव्हिजनकडे आपला मोर्चा वळविला. ‘आय कम इन मॅडम’ आणि ‘भाबीजी घर पर हैं!’ या हिंदी मालिकांमुळे तिला प्रसिद्ध मिळाली. ती सतत सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या या साडी लूकवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. नेहाने नुकताच तिचा सुदंर असा हिरव्या साडीतला नवा लूक शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिची कंबर फ्लोन्ट करत आहे. नेहा पेंडसे ही अशी एक मराठी अभिनेत्री आहे जिने मराठी सोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांतही काम केले आहे. याशिवाय तिने टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून देखील अभिनेत्री नेहा पेंडसे ओळखली जाते. नेहा बिग बॉस सीझन 12 ची स्पर्धकही राहिली आहे.नेहाचे खरे नाव शुभांगी असे आहे. टीव्ही मालिकांव्यतिरिक्त नेहा पेंडसेने अनेक चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट आणि प्रायोजकत्वातून पैसे कमवले आहेत. नेहाने इंडस्ट्रीत बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली. तिला आज इंडस्ट्रीत २९ वर्ष झाली आहेत. View this post on Instagram A post shared by Nehha Pendse (@nehhapendse) हेही वाचाः गश्मीर महाजनीची नवी सुरुवात; वाढदिवसानिमित्त पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाची घोषणा