अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शकाच्या भूमिकेत; ‘मना’चे श्लोक चित्रपटाचे हटके पोस्टर रिलीज

Mrunmayi Deshpande : अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आजवर अनेक मराठी चित्रपटात वेगवेगळ्या विषयांवर असलेल्या चित्रपटात काम केले आहे. आता मृण्मयी अभिनयासोबतच दिग्दर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तिच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘मना’चे श्लोक असे असून, या चित्रपटाचे पोस्टर तिने स्वतः इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
या चित्रपटाचे लक्षवेधक पोस्टर पाहून सोशल मीडियावर ‘मना’चे श्लोक चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘मना’चे श्लोक चित्रपटाच्या पहिल्याच लक्षवेधक पोस्टरमध्ये ‘मना’चा श्लोक कोण आहे, याचा अंदाज येत आहे. पोस्टरमधील दिसणारे मनवा आणि श्लोक यांचे चेहऱ्यावरील भाव खूप काही सांगून जात आहेत. दोघांचं नातं नक्की काय आहे? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असून हे पाहायला प्रेक्षक खूप उत्सुक झाले आहेत.
View this post on Instagram
ही आहे ‘मनवा’ आणि हा आहे ‘श्लोक’ .. पण मनवाच्या ‘मनात’ आहे का श्लोक? हे हसत नाहीयेत, एकमेकांशी बोलत नाहीयेत.. काहीतरी झालं आहे नक्की! काय झालं आहे ते लौकरच कळेल, पण ‘मन’ जुळेल? असे हटके कॅप्शन या पोस्टरच्याखाली मृण्मयीने दिले आहे. यामुळे ‘मना’चे श्लोक चित्रपटाची उत्सकुता खूप वाढली आहे.
या चित्रपटात मृण्मयी आणि राहुलसोबत पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब या कलाकारांच्याही भूमिका असणार आहेत. गणराज स्टुडिओ आणि संजय दावरा एक्सपरिअन्स निर्मित, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मना’चे श्लोक’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे हिने केले आहे. हा चित्रपट १ अॅागस्ट रोजी थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे.





