अभिनेत्री मिताली मयेकरची विदेशवारी; बोल्ड लुक पुन्हा व्हायरल

थायलंड – अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे कपल सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेक फोटो आणि व्हिडिओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अनेकदा मिताली विविध ठिकांणाना भेट देताना दिसते. सध्या ती थायलंडमध्ये तिची सुट्टी एन्जॉय करत आहे. तेथील बोल्ड व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
इन्स्टाग्रामवर मितालीने थायलंडमधील वेगवेगळी ठिकाणाचे व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यात ती सुरुवातील स्विमिंग पूलमध्ये असल्याचे दिसते. तिच्या या बोल्ड लुकने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. याशिवाय तिने परिधान केलेले आऊटफिटही चर्चेत आले आहेत. थायलंडमधील विविध ठिकाणी भेटण्याचा आनंद ती मनमुरादपणे घेताना दिसत आहे. सध्या मितीलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
यापूर्वी मिताली आणि सिद्धार्थ स्पेनमध्ये फिरण्यासाठी गेले होते. स्पेन ट्रिपदरम्यान मितालीने बिकिनी परिधान करत समुद्रकिनारी फोटोशूट केले होते.या लुकमध्ये ती फारच हॉट अंदाजात दिसत आहे. हे फोटो शेअर करत मितालाने नेटकऱ्यांना एक सल्लाही दिला होती. “आज सकाळी उठून मी कॉन्ट्रोव्हर्सीला निवडलं. कमेंट सेक्शनमध्ये ‘आपली संस्कृती’ याबाबत ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला स्वत:ची लाज वाटेल,” असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते. मितालीच्या या फोटोवर काहींनी टीका देखील केली होती. बोल्ड फोटोंमूळे अनेकदा मितालीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.





