Mamta Kulkarni : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीने घेतला संन्यास

मुंबई : 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जिने आपल्या सौदर्याने प्रेक्षकांना वेड लावले होते. ती अचानक इंडस्ट्रीतून गायब झाली. मात्र काही दिवसांपूर्वी ती पुन्हा चर्चेत आली आणि तेव्हापासून तिच्याविषयी सतत काही नाही माहिती समोर येत आहेत. या अभिनेत्रीचे नाव आहे ममता कुलकर्णी. ती सध्या प्रयागराज महाकुंभला पोहोचली आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.
ममता कुलकर्णीने घेतला संन्यास
ममता कुलकर्णीने महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतला आहे. तिला किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनवलं जात आहे. ज्यामध्ये ममता कुलकर्णी यांना चादर पोशी विधी करून महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली. ममता कुलकर्णीला आजपासून श्री यामाई ममता नंद गिरि नावाने ओळखली जाईल. जुना आखाडाचे आचार्य नारायण त्रिपाठी यानी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली आहे. संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीने भगवे वस्त्र धारण केले.
ममता विषयी बोलायचे झाले तर 1992 मध्ये आलेल्या तिरंगा या सुपरहिट चित्रपटातून तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ममता कुलकर्णीने जवळपास 40 बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. आशिक आवारा, करण अर्जुन, वक्त हमारा है आणि क्रांतिवीर यांसारख्या मोठ्या चित्रपटांतून तिने आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य केले. 2001 मध्ये रिलीज झालेला छुपा रुस्तम हा तिचा शेवटचा हिट चित्रपट होता. यानंतर तिने मनोरंजन उद्योगाला अलविदा केला आणि केनियाला गेली. ममताने हिंदीशिवाय कन्नड, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे.
View this post on Instagram
24 वर्षांनी ममता भारतात परतली
नुकतीच ममता कुलकर्णी 24 वर्षांनी भारतात परतली आहे. अभिनेत्री इतकी वर्षे कुठे राहिली या प्रश्नावर ती म्हणाली होती, ‘माझ्या भारत सोडण्याचे कारण अध्यात्म होते.1996 मध्ये माझा अध्यात्माकडे कल वाढला आणि त्यादरम्यान माझी भेट गुरु गगन गिरी महाराज यांच्याशी झाली. त्यांच्या आगमनानंतर माझी अध्यात्माची आवड वाढली. यानंतर माझी तपश्चर्या सुरू झाली.
अभिनेत्रीने तिच्या भूतकाळातील आयुष्याविषयी देखील सांगितले की, “मला बॉलिवूडने मला नाव आणि प्रसिद्धी दिली. यानंतर बॉलीवूडचाही पाठिंबा कमी झाला. सन 2000 ते 2012 पर्यंत मी तपश्चर्या करत राहिले. मी अनेक वर्षे दुबईत होते आणि दोन बेडरूमच्या हॉलमध्ये राहिले आणि 12 वर्षे ब्रह्मचारी होते.





