‘अभिनेत्री मलायका अरोरावर’ कोसळलं दुःखाचं ‘डोंगर’; वडिलांनी टेरेसवरून उडी मारून संपवलं ‘जीवन’

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांचे निधन झाले आहे. अनिल यांनी आज टेरिसवरून उडी मारून आत्महत्या केली. सकाळी ९ वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर मलायकाचे कुटुंबीय आणि तिच्या परिचितांना धक्का बसला आहे. माहिती मिळताच मुंबई पोलीस अभिनेत्रीच्या घरी पोहोचले असून तपास करत आहेत. मलायका आणि तिच्या कुटुंबासाठी हा खूप दुःखाचा आणि कठीण काळ आहे.
या कठीण काळात मलायकाचा माजी पती अरबाज खानही तिच्या घरी पोहोचला आहे. अरबाज खान मलायकाच्या घराबाहेर पोलिस आणि इतर लोकांशी बोलताना दिसला.
मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा हे पंजाबी हिंदू कुटुंबातील होते. त्यांचे कुटुंब सीमेवर वसलेल्या फाजिल्का जिल्ह्यातील रहिवासी होते. अनिल इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये काम केले आहे. अनिल अरोरा यांनी मल्याळी ख्रिश्चन कुटुंबातील जॉयस पॉलीकार्पशी लग्न केले.
जुलै 2023 मध्ये हॉस्पिटमध्ये दाखल होते अनिल अरोरा
गेल्या वर्षी प्रकृतीच्या कारणामुळे मलायकाचे वडील मुंबईतील रुग्णालयात दाखल होते. त्यावेळी मलायका अनेक वेळेस तिच्या आईसोबत, जॉय यांच्यासह हॉस्पिटलमध्ये दिसली होती. मात्र तिच्या वडिलांना नेमकं काय झालं होतं, त्यांच्यावर कसले उपचार सुरू होते, हे स्पष्ट झालं नाही.
=================




