सलमानसह बॉडीगार्डवर अभिनेत्रीने केले गंभीर आरोप,’dabangg 3 च्या सेटवर मला कुत्र्यासारखी वागणूक’

अभिनेता सलमान खानच्या होम प्रॉडक्शन ‘दबंग 3’ मध्ये काम करणारी अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर हेमा शर्मा उर्फ वायरल भाभी हिने धक्कादायक दावा केला आहे. हेमा म्हणते की 2019 मध्ये जेव्हा ती सलमान खानला भेटायला आणि फोटो काढण्यासाठी पोहोचली तेव्हा सलमानच्या बॉडीगार्डने तिच्याशी गैरवर्तन केले.
त्या घटनेची आठवण करून देताना, हेमा म्हणाली, “मला ‘दबंग 3’ मध्ये काम करायचे होते आणि मला सलमान खान सरांना भेटायचे होते. त्यामुळे मी खूप आनंदी होते आणि देवाचे आभार मानले.. मात्र, ज्या सीनमध्ये हेमा दिसली ती सलमानशिवाय शूट करण्यात आली होती.त्यामुळे मी खूप निराश झाले होते. शूटिंगनंतर मला फक्त सलमान सरांना एकदा भेटायचे होते. आणि एक फोटो काढायचा होता. त्यासाठी पंडित जनार्दन यांनी मला आश्वासन दिले की भेट होईल. पुढे आम्ही सलमान सरांना भेटायला गेलो. तेव्हा मला किती वाईट वागणूक मिळाली. अपमानित केले गेले हे मी सांगू शकत नाही. मला कुत्र्यासारखे हाकलून देण्यात आले कारण मला त्याच्यासोबत एक फोटो काढायचा होता.’अस म्हणत तिने गंभीर आरोप लावले.
सलमानच्या बॉडीगार्डने गुंडांप्रमाणे वागण्याचा आणि सुपरस्टारच्या आसपासच्या लोकांबद्दल आदर न दाखवल्याचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच बॉलिवूड अभिनेता विकी कौशललाही ‘वॉन्टेड’ स्टारच्या सिक्युरिटीतून काढून टाकण्यात आले. त्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि सर्व अटकळांना पूर्णविराम दिला.





