अभिनेत्री कृतिका कामराने दिली प्रेमाची कबुली; शेअर केले खास फोटो

Kritika Kamra | अभिनेत्री कृतिका कामराला ‘इतनी मोहोब्बत है’ या मालिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. क्रिकेट होस्ट आणि कंटेंट क्रिएटर गौरव कपूरसोबत तिच्या डेटींगच्या चर्चांना उधाण आले होते. तिने रिलेशनशिपमध्ये असल्याची हिंट दिली होती. आता तिने जाहीररित्या प्रेमाची कबुली दिली आहे.
कृतिका कामराने इन्स्टाग्रामवर गौरवसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. ‘ब्रेकफास्ट विथ…’ असं कॅप्शन तिने दिलं आहे. यामध्ये तिने गौरवचा कँडीड फोटो आणि स्वत:चा सेल्फी घेतानाचा फोटो पोस्ट केला आहे. सोबतच ब्रेकफास्ट मेन्यूची झलक दाखवली आहे.
View this post on Instagram
यानंतर तिने गौरवसोबत शूजचा फोटो पोस्ट केला आहे. सोबतच ‘बबीज’ असं लिहिलेले दोन टी कप घेत चिअर्स करतानाचा व्हिडीओही तिने पोस्ट केला आहे. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव केला जात आहे.
कृतिका कामरा काही वर्षांपूर्वी करण कुंद्राला डेट करत होती. दोघांच्या अफेअरची आणि नंतर ब्रेकअपची खूप चर्चा झाली. टीव्ही आणि बॉलिवूडनंतर आता कृतिका कामरा ओटीटी प्लॅटफॉर्मवरही जोरदार धमाल करत आहे. मागील वर्षी कृतिका ‘ग्यारह ग्यारह’ सीरिजमध्ये दिसली. तर आता तिचा ‘द ग्रेट शमशुद्दीन फॅमिली’ सिनेमा रिलीज होणार आहे. Kritika Kamra |
कृतिका कामराच्या वयाबद्दल बोलायचं तर ती ३७ वर्षांची आहे, तर गौरव कपूर तिच्यापेक्षा ७ वर्षांनी मोठे म्हणजे ४४ वर्षांचे आहेत. दोघांमध्ये बराच वयाचा फरक आहे, पण त्यांची केमिस्ट्री आणि बॉण्डिंग चांगली जुळली आहे. Kritika Kamra |
हेही वाचा:
बॅाक्स अॅाफिसवर ‘धुरंधर’ची हवा; अवघ्या पाच दिवसांत ‘इतक्या’ कोटींची कमाई




