अभिनेत्री खुशबू तावडे दुसऱ्यांदा झाली आई

Khushboo Tawde | अभिनेत्री खुशबू तावडे दुसऱ्यांदा आई झाली आहे. खुशबूने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेत ती पाहायला मिळाली. मात्र तिने नंतर मालिकेचा निरोप घेतला. त्यानंतर खुशबूला कन्यारत्न प्राप्त झाले आहे.
अभिनेत्री वैशाली भोसलेने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. खुशबूसोबतचा फोटो शेअर करत “मुलगी झाली…अभिनंदन.” असे तिने लिहिले आहे. यानंतर खुशबूवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. Khushboo Tawde |
ऑगस्ट महिन्यात खुशबूचे घरी साध्या पद्धतीने मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत दुसरं डोहाळे जेवण पार पडलं होतं. तर संग्राम व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून उपस्थित राहिला होता. मालिकेच्या चित्रीकरणामुळे तो येऊ शकला नव्हता. Khushboo Tawde |
खुशबू तावडेचं २०१८ साली अभिनेता संग्राम साळवीशी लग्न झालं. त्यानंतर २ नोव्हेंबर २०२१ रोजी दोघं पहिल्यांदाच आई-बाबा झाले. अभिनेत्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचे नाव राघव आहे. खुशबू व संग्रामचा पहिला मुलगा राघव आता ३ वर्षांचा आहे. त्यानंतर आता खुशबूने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. Khushboo Tawde |
खुशबूने हिंदीसह मराठी मालिकांमध्येही काम केले आहे. खूशबूने ‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका सोडल्यानंतर तिच्या जागी अभिनेत्री पल्लवी वैद्य उमा हे पात्र साकारले. नुकताच या मालिकेनं निरोप घेतला.
हेही वाचा:
राम चरण – कियारा अडवाणीच्या ‘गेम चेंजर’चा टीझर दसऱ्याला होणारा रिलीज

