अभिनेत्री काजोलचे साडीत खुलले सौंदर्य; पोस्ट शेअर करत सांगितले आयुष्याचं रहस्य

Kajol Photoshoot | अभिनेत्री काजोल सध्या बॉलीवूडपासून दुर असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र ती सोशल मीडियावर सक्रिय असते. अलीकडेच तिने साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात तिने सुंदर पोज देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये काजोलने पांढऱ्या रंगाच्या साडीत परिधान केली आहे. तसेच ती खडकीत शांतपणे बसली आहे. काही फोटो पोस्ट करत काजोलने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आयुष्याचं रहस्य म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करण्यात वेळ वाया घालवणं,’ यात तिने तिच्या आयुष्याचं रहस्य सांगितलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट तुफान व्हायरल होत असून तिच्या या लुकचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे.
View this post on Instagram
वर्कफ्रंट बोलायचे झाले तर, काजोल आगामी ‘माँ’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा बहुप्रतीक्षित सिनेमा 27 जून 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. काजोलसोबत यात रोनित रॉय, इंद्रनील सेनगुप्ता, जितिन गुलाटी, गोपाल सिंह, सूरज्यशिखा दास, यानी भारद्वाज, रूपकथा चक्रवर्ती आणि खेरिन शर्मा हे सहाय्यक कलाकार म्हणून दिसतील. Kajol Photoshoot |
विशाल फुरिया यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘माँ’ सिनेमाची कथा साईविन क्वाड्रास यांनी लिहिली आहे. जियो स्टुडिओ आणि देवगन फिल्म्सद्वारे सादर केलेल्या “माँ” ची निर्मिती अजय देवगन आणि ज्योति देशपांडे यांनी केली असून कुमार मंगत पाठक हे सह-निर्माते आहेत. Kajol Photoshoot |
हेही वाचा :
एकनाथ शिंदेंची अर्थखात्याबाबत थेट अमित शाहांकडे तक्रार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितले…





