अभिनेत्री जास्मिन भसीनला लेन्स वापरणे पडले महागात, ‘डोळ्याचा कॉर्निया झाला खराब’

जस्मिन भसीनने या घटनेची माहिती देतांना सांगितले की, ‘ मी डोळ्यात लेन्स घातल्या, पण यानंतर मला त्रास होऊ लागला. डोळ्यात जळजळ होत होती, त्यामुळे ती वेदनेने ओरडू लागली होती. मी कार्यक्रमात चष्मा घातला. जेव्हा मला वेदना सहन झाल्या नाही त्यावेळी लगेच मी डॉक्टरांकडे गेले. मला तिथे कळेल की डोळ्यांच्या कॉर्नियाला इजा झाली आहे. यानंतर मी मुंबईत येऊन उपचार घेतले. सध्या माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली असून, दुखण्यापासून अद्याप आराम मिळत नाही.’
जस्मिन अलीकडेच ‘लाफ्टर शेफ’मध्ये दिसली होती, ज्यामध्ये ती बॉयफ्रेंड अली गोनीसोबत स्वयंपाक करताना दिसली होती पूर्वी हा शो कलर्स चॅनल आणि जिओ सिनेमा ॲपवर शनिवार आणि रविवारी रात्री ९ वाजता प्रसारित केला जात होता, परंतु आता रोहित शेट्टीचा शो ‘खतरों के खिलाडी 14’ यावेळी प्रसारित केला जाईल. अशा परिस्थितीत 1 ऑगस्टपासून ‘लाफ्टर शेफ’ गुरुवार आणि शुक्रवारी रात्री 10 वाजता येणार आहे.





