अभिनेत्री जान्हवी कपूरची तब्येत बिघडली; उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची अचानक तब्येत बिघडल्याने तिला मुंबईतील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.जान्हवी कपूरला मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जान्हवीला फूड पॉयझनिंग झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जान्हवी कपूरला अन्नातून विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे.
काय झालं नेमके?
जान्हवी कपूर चेन्नईला गेली होती. चेन्नईहून परतताना जान्हवीने विमानतळावर काहीतरी खाल्लं ज्यातून तिला विषबाधा झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विमानतळावरुन घरी आल्यानंतर जान्हवीची प्रकृती खालावली होती आणि बुधवारी तिला खूप अशक्तपणा जाणवत होता. जान्हवीची तब्येत बिघडल्याने आणि अशक्तपणा जाणवत असल्याने तिला बुधवारी डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कधीपर्यंत मिळणार डिस्चार्ज?
जान्हवी कपूरला अन्नातून विषबाधा झाली होती. त्यामुळे तिला बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जान्हवीची प्रकृती सध्या ठीक आहे. तिला शुक्रवारपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.





