Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली
दिल्ली न्यायालयाने ३० मे रोजी या प्रकरणात अभिनेत्री, कथित ठग सुकेश चंद्रशेखर आणि इतर १५ जणांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध अभिनेत्रीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Jacqueline Fernandez – बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने कथित मनी लाँड्रिंग प्रकरणातील याचिका मागे घेतली आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात आपल्यावर आरोप निश्चित करण्याच्या दिल्ली न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका मागे घेण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जॅकलीन फर्नांडिसला दिली.
जॅकलिनच्या वकिलांनी योग्य तो कायदेशीर मार्ग अवलंबण्याच्या मुभा घेऊन ही विशेष रजा याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली आहे, असे न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती बागची यांच्या खंडपीठाने नमूद केले.
सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या विनंतीनुसार याचिका मागे घेण्यास आणि त्यासोबत आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची मुभा दिली.