अभिनेत्री ईशा गुप्ताचं साजिद खानसोबत कडाक्याच भांडण; हमशक्कल चित्रपटाच्या शुटिंगवेळी नेमकं काय घडलं? अभिनेत्री म्हणाली….

Esha Gupta : दिग्दर्शक आणि निर्माते साजिद खान यांचा हमशक्कल नावाचा चित्रपट येऊन गेला आहे. या चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर बऱ्यापैकी कमाई केली होती. अभिनेता सैफ अली खान या चित्रपटात लीड रोलमध्ये होता. तर अभिनेत्री ईशा गुप्तानेही या चित्रपटात काम केले आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत ईशाने हा चित्रपट सोडणार होते, पण साजिदने मनधरणी आणि माफी मागितल्यानंतर या चित्रपटात काम केल्याचा खुलासा केला आहे. तसेच अभिनेत्रीने साजिद खान यांच्यावर मी टू मोहिमेद्वारे गंभीर आरोप करण्यात आले होते. यावर देखील भाष्य केले आहे.
नुकतीच अभिनेत्री ईशा गुप्ताने सिद्धार्थ कनन यांना मुलाखत दिली आहे. हमशक्कल चित्रपटाच्या शुटिंगवेळी माझ्यात आणि दिग्दर्शक साजिद खान यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. त्यानंतर मी हा चित्रपट सोडणार होते. मात्र, चित्रपटाच्या निर्मात्यांनी माझी माफी मागितली. त्यानंतर साजिद खान यांनी देखील माफी मागितली असल्याचे ईशाने या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.
यावर बोलताना पुढे अभिनेत्री म्हणाली, या चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी त्यांनी मला अर्वाच्च भाषेत शिव्या दिल्या. मग मीही त्यांना जशाच तसे उत्तर दिले. मला अशी माणसं बिलकुल पसंत नाहीत, एखाद्याने आपल्याशी चांगला व्यवहार केला, तर आपणही त्याच्यासोबत तसा व्यवहा करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी बोलताना ईशाने व्यक्त केले. तसेच त्या इन्सीडेंटवरून मी मुव्ह अॅान केल्याचे देखील अभिनेत्रीने स्पष्ट केले.
पण मी एवढे सांगते की…
मी टू मोहिमे अंतर्गत साजिद खान यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. यावर भाष्य करताना ईशा म्हणाली, मी कधीही साजिद खान यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर कमेंट केलेली नाही. पण मी एवढे सांगते की, आमचं कडाख्याचं भांडण हमशक्कच्या शुटिंगवेळी झालं होतं, त्याने मला शिव्याही दिल्या मात्र त्याने कधीही सेक्शुयली काहीही केले नाही.
हेही वाचा : अॅक्सिओम-४ मिशन ! अवकाशात उड्डाण करण्यापूर्वी शुभांशू शुक्लाचा समोर आला पहिला फोटो





