अभिनेता उपेंद्र लिमये दिसणार साऊथ चित्रपटात

उपेंद्र लिमये हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत. ‘जोगवा’, ‘यलो’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘ऍनिमल’ अशा विविध चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रत्येक भूमिकेला उपेंद्रने योग्य न्याय दिला आहे. ‘ऍनिमल’ या चित्रपटात त्याने फ्रेडी पाटीलची भूमिका साकारली होती. हे पात्र रणबीर कपूरला म्हणजेच रणविजय सिंगला मशीन गन पुरवते. ‘ऍनिमल’मधील त्याचे पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीत पडलं. अशात आता लवकरच तो साऊथ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
आता उपेंद्रच्या पुढील चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली आहे. तो व्यंकटेश आणि अनिल रविपुडी यांच्या तेलगू चित्रपटाचा भाग असणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला हैदराबादमध्ये सुरुवात झाली आहे. तेलुगू चित्रपटसृष्टीतील उपेंद्रचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे.
या साऊथ चित्रपटात उपेंद्रसोबत मीनाक्षी चौधरी आणि ऐश्वर्या राजेश मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय राजेंद्र प्रसाद, साई कुमार, नरेश, व्हीटी गणेश, मुरलीधर गौर, पम्मी साई आणि साई श्रीनिवास सहाय्यक भूमिकेत आहेत.
उपेंद्रच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, ‘ॲनिमल’ नंतर ‘मडगाव एक्सप्रेस’ हा त्याचा नवा हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात त्याने मेंडोझा नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. तो शेवटचा ‘कर्म विरायण’ या मराठी चित्रपटात दिसला होता. याशिवाय त्याने ‘माय नेम इज 340’, ‘डार्लिंग’, ‘चांदनी बार’ आणि ‘पेज 3’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी ‘तारा फ्रॉम सातारा’ या टीव्ही शोमध्येही काम केले आहे.





