अभिनेता टायगर श्रॉफची हॉलिवूडकडे वाटचाल

Tiger Shroff | अभिनेता टायगर श्रॉफने बॉलीवूडमधील यशस्वी कामगिरीनंतर आता हॉलिवूडकडे वाटचाल केली आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोणनंतर हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी टायगरला मिळाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टायगर श्रॉफ एका जागतिक स्तरावरील अॅक्शन प्रोजेक्टसाठी चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दिग्गज अभिनेता आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेता सिल्वेस्टर स्टॅलोन तसेच सुप्रसिद्ध थाई मार्शल आर्ट्स कलाकार टोनी जा यांचीही नावे चर्चेत आहेत. या प्रोजेक्टचं निर्मितीकार्य अमेझॉन एमजीएम स्टुडिओजकडून होणार आहे.
या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी एका भारतीय दिग्दर्शकाकडे सोपवण्याबाबत चर्चा आहे. अद्याप कथानक, शूटिंग लोकेशन किंवा प्रदर्शित होण्याची तारीख याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र बहुभाषिक चित्रपट म्हणून तो जगभर प्रदर्शित करण्याचा विचार आहे. याची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे, मात्र टायगर श्रॉफच्या हॉलिवूड पदार्पणाची शक्यतेने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. Tiger Shroff |
दरम्यान, टायगर श्रॉफने ‘हिरोपंती’, ‘वॉर’, आणि ‘बागी’ मालिकेद्वारे भारतीय प्रेक्षकांना आपली वेगळी अॅक्शन स्टाईल दाखवली. अलीकडेच ‘बागी-४’ चित्रपटामध्ये टायगरचा जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळाला होता. त्यामुळे हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये त्याची निवड झाली तर त्याच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळू शकते.
हेही वाचा:
“रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं?, याची चौकशी करा”; अनिल परबांचा घणाघात





