Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांचा तपास सुरू
अभिनेते तुषार कपूर आणि आयुष्मान खुराना यांनाही यापूर्वी अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या.

Saif Ali Khan – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीक हत्या प्रकरणातील फरार आरोपी झीशान अख्तरच्या नावाने बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला असून, धमकीच्या सत्यतेची पडताळणी करत आहेत.
अभिनेता सैफ अली खानला त्याच्या फोनवर झीशान अख्तरच्या नावाने एक व्हॉइस मेसेज आला आहे, ज्यात त्याचाही शेवट बाबा सिद्दीकसारखाच होईल, असे म्हटले आहे.
ही धमकी खरोखरच झीशान अख्तरकडून आली होती की, कोणीतरी दुसराच त्याचे नाव घेऊन यंत्रणांना त्रास देण्यासाठी अशाच प्रकारच्या युक्त्या वापरत आहे, याची तपासणी अधिकारी करत आहेत. अभिनेते तुषार कपूर आणि आयुष्मान खुराना यांनाही यापूर्वी अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या.
अशाच एका प्रकरणात, मुंबई पोलिसांनी बंगळूर येथील ३० वर्षीय आयआयटी पदवीधर वैभव मिश्राला अटक केली, ज्याचा कोणत्याही टोळीशी संबंध नसतानाही धमक्या देण्यासाठी त्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्याचा आरोप आहे.






