अभिनेते प्रकाश राज यांनी घेतली कुणाल कामराची भेट; सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल, पोस्ट लिहित म्हणाले…

Actor Prakash Raj | प्रसिद्ध स्टॅन्डअप कॅामेडियन कुणाल कामरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केल्या प्रकरणी चर्चेत आला होता. त्याने सादर केलेल्या कवितेमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ज्या स्टुडिओत कामराने कविती सादर केली होती. तो अंधेरी येथील स्टुडिओ शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फोडला.
आता या प्रकरणात प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याने एक फोटो शेअर केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांचा स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामरासोबतचा एक फोटो त्यांच्या एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे.
अभिनेते प्रकाश राज यांनी नुकतीच स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामराची भेट घेतली. प्रकाश यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरुन कुणाल कामरासोबतचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ते दोघेही हसत असल्याचे दिसत आहे. प्रकाश राज यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, भाऊ, तू तामिळनाडूत कसा पोहोचलास? साध्या ऑटोमध्ये. यासोबतच त्यांनी हॅशटॅगमध्ये लिहिले की मी फक्त विचारत आहे.
Tamilnadu kaise pahunchneka bhai ..?? Simple .. Auto mein @kunalkamra88 #justasking pic.twitter.com/3sLW7SA4k2
— Prakash Raj (@prakashraaj) April 11, 2025
अभिनेता प्रकाश राज यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दिलेले कॅप्शन एका अॅडिओ क्लिपमध्ये जोडले जात आहे. या व्हायरल क्लिपमध्ये बोलणारी व्यक्ती शिवसेना कार्यकर्ता असल्याचे सांगत कामराला धमकी दिली आहे. ज्या पद्धतीने स्टुडिओचे केले त्याच पद्धतीने त्याचे देखील करणार असल्याची धमकी दिली गेली आहे. ही क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यानंतर, व्हायरल क्लिपमध्ये, जेव्हा बोलणारी व्यक्ती कामराला कुठे आहेस असे विचारते त्यावेळी ऐकणारी व्यक्ती फक्त तामिळनाडूमध्ये भेटेल असे सांगते.
दुसऱ्या बाजूला फोन करणारी व्यक्ती पुन्हा विचारते की कुणाल कुठे मिळेल, ज्यावर विनोदी कलाकार उत्तर देतो, तामिळनाडूला या, ज्यावर फोन करणारा विचारतो, आता मी तामिळनाडूला कसा पोहोचू भाऊ? म्हणूनच प्रकाश राज यांच्या कॅप्शनला या क्लिपमध्ये जोडले जात आहे.





