‘पुष्पा 2’ मधील खलनायक बॉलीवूडमध्ये करणार पदार्पण; ‘या’ अभिनेत्रीसोबत झळकणार

Fahadh Faasil Debut In Bollywood | मल्याळम इंडस्ट्रीतील अभिनेता फहाद फासिल बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तो तृप्ती डिमरीसोबत रोमान्स करताना पाहायला मिळणार आहे. तृप्तीला ‘ॲनिमल’ चित्रपटानंतर मोठी लोकप्रियता मिळाली. आता दोन्ही कलाकरांना एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली त्यांच्या पुढील प्रोजेक्टसाठी फहाद फासिलला विचारलं आहे. इम्तियाज अली आगामी प्रोजेक्ट फक्त दिग्दर्शित करणार नसून निर्मितीची धुरादेखील सांभाळणार आहेत. यामध्ये तृप्ती डिमरी फहादची हिरोइन असणार आहे. फहाद फासिलही इम्तियाज अली यांच्या प्रोजेक्टमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी खूप उत्सुक आहे.
View this post on Instagram
गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज अली त्यांच्या या आगामी प्रोजेक्टविषयी चर्चा करत आहे. तसंच प्रोजेक्टबाबत काही करार देखील झाले आहेत. शिवाय प्रोजेक्टच्या कथेला फायनल टच दिला जात आहे. प्रोडक्शन काम जानेवारीच्या मध्यावर सुरू होणार असल्याची माहितीही समोर येत आहे. इम्तियाज अली त्याच्या विंडो सीट फिल्म्स बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहेत.
फहाद फासिलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पुष्पा या चित्रपटातील फहादच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. अलीकडेच एका कार्यक्रमात अल्लू अर्जुनने फहादचे खूप कौतुक केले. ‘पुष्पा 2’ 5 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर तृप्ती डिमरी शेवटची कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि माधुरी दीक्षितसोबत ‘भूल भुलैया 3’ मध्ये दिसली होती.
हेही वाचा:
Maharashtra Oath Ceremony : देवेंद्र फडणवीसांसोबत आज कोण घेणार शपथ; ‘ही’ अपडेट आली समोर





