अभिनेते डॅा. विलास उजवणे यांचे दीर्घ आजाराने निधन; वयाच्या ६२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कलाविश्वावर शोककळा

Actor Dr. Vilas Ujwane passes away | मराठी सिनेसृष्टीतील वादळवाट फेम अभिनेते डॅा. विलास उजवणे यांचं दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. ते ब्रेन स्ट्रोन या आजाराने त्रस्त होते. त्यांनी अनेक मराठी सिरियल, चित्रपट यामध्ये काम केले आहे.
तसेच हिंदी चित्रपटातूनही त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक या आजारने निदान झाले होते. तसेच हृदयासंबंधीचा विकार झाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. मिरारोड येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांची उपचार दरम्यान प्राणज्योत मालावली.
अभिनेते डॉ. विलास उजवणे हे वादळवाट या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहचले. त्यांच्या ‘चार दिवस सासूचे’, ‘दामिनी’, या देखील मालिका प्रसिद्ध झाल्या होत्या. डॉ. उजवणे यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ४ एप्रिल २०२५ रोजी मीरारोड येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. उजवणे यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशीही माहिती समोर आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असं कुटुंब आहे.
त्यांच्या निधानाने कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहली. त्यांच्यासोबत काम केलेल्या कलाकारांनी त्यांच्या आठवणीला उजाळा दिला. डॉ. विलास उजवणे ब्रेनस्ट्रोक या आजाराशी झुंज देत होते.





