Actor Death : मनोरंजन विश्वात हळहळ ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन
हॉलिवूडच्या अत्यंत लोकप्रिय आणि ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'द सोप्रानोस' या मालिकेतील गँगस्टरच्या उत्कृष्ट भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते व्हिन्सेंट पास्टोर (Actor Death) यांचे निधन झाले आहे.

Actor Death : हॉलिवूडच्या अत्यंत लोकप्रिय आणि ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘द सोप्रानोस’ या मालिकेतील गँगस्टरच्या उत्कृष्ट भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते व्हिन्सेंट पास्टोर (Actor Death) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अकाली जाण्याने हॉलिवूडसह जगभरातील चित्रपटसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
राहत्या घरी आढळले मृतावस्थेत
व्हिन्सेंट पास्टोर यांच्या निधनाबाबतची अधिकृत माहिती त्यांचे मॅनेजर बॉब मॅकगोवन यांनी ‘द असोसिएटेड प्रेस’ला दिली. गेल्या काही दिवसांपासून पास्टोर हे कोणाच्याही संपर्कात नव्हते. त्यानंतर न्यू यॉर्कमधील ‘सिटी आयलंड’ येथील त्यांच्या निवासस्थानी ते मृतावस्थेत (Actor Death) आढळून आले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अधिक तपास सुरू आहे.
सह-कलाकार मायकल इम्पेरिओली यांची भावनिक पोस्ट
पास्टोर यांच्या निधनाची बातमी त्यांचे जवळचे मित्र आणि ‘द सोप्रानोस’ मालिकेतील सह-कलाकार मायकल इम्पेरिओली यांनी सोशल मीडियाद्वारे दिली. इन्स्टाग्रामवर एक अत्यंत भावुक पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“माझा प्रिय मित्र आणि सहकारी व्हिन्सेंट पास्टोर आता आपल्यात राहिले नाहीत. हा संपूर्ण कुटुंबासाठी आणि आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी क्षण आहे. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले; अमेरिका, इटली आणि ऑस्ट्रेलियाचा प्रवास केला. त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्या कायम स्मरणात राहील. ‘विनी’ माझ्यासाठी भावासारखा होता. तो अत्यंत दयाळू, सहृदयी आणि आपल्या कुटुंबावर व मित्रांवर मनापासून प्रेम करणारा माणूस होता. त्याची उणीव आम्हाला कायम जाणवत राहील.”
नौदलातील सेवेपासून अभिनयाच्या प्रवासापर्यंत
अभिनेता होण्यापूर्वी व्हिन्सेंट पास्टोर यांनी अमेरिकन नौदलात देशसेवा बजावली होती. इतकेच नव्हे तर त्यांनी व्हिएतनाम युद्धातही सहभाग घेतला होता. लष्करी सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पेस युनिव्हर्सिटीमधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर अभिनयाच्या जगतात पाऊल ठेवले.
‘द सोप्रानोस’ आणि गँगस्टरची अजरामर भूमिका
पास्टोर यांनी १९८० च्या दशकात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९९० च्या दशकात त्यांनी हॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, त्यांच्या कारकिर्दीतील सुवर्णकाळ ठरला तो ‘द सोप्रानोस’ या मालिकेतील अभिनय.
या मालिकेत त्यांनी सुरुवातीला एका प्रभावी गुन्हेगाराची (गँगस्टर) भूमिका साकारली होती. पुढे ते पात्र एफबीआयचे (FBI) खबरी बनून कथानकाला एक नाट्यमय वळण देते. त्यांच्या या अष्टपैलू आणि दमदार अभिनयाला जगभरातील प्रेक्षकांसह समीक्षकांनीही भरभरून दाद दिली होती.
चित्रपट, टीव्ही मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांत आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या या दिग्गज कलाकाराच्या (Actor Death) निधनाने हॉलिवूडने एक अत्यंत अनुभवी आणि ताकदीचा अभिनेता गमावला आहे.






