Priyanka Chopra Upcoming Movie: बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra ) सध्या हॉलिवूडमध्ये मोठं नाव कमावत आहे. अभिनय, निर्मिती आणि ग्लोबल प्रोजेक्ट्समुळे ती सतत चर्चेत असते. आता प्रियंकाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रियंका लवकरच ‘रीसेट’ नावाच्या नव्या हॉलिवूड चित्रपटात झळकणार असून या चित्रपटात तिच्यासोबत प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता ‘ऑरलॅंडो ब्लूम’ दिसणार आहे. ‘रीसेट’ हा एक सर्व्हायवल थ्रिलर चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मॅट स्मूकलर करणार आहेत. चित्रपटाबाबतची माहिती समोर आल्यानंतर प्रियंकाने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही बातमी शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. तिच्या पोस्टवर अभिनेत्री दिया मिर्झानेही प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर प्रियंकाच्या चाहत्यांनीही उत्साह व्यक्त करत तिचं अभिनंदन केलं आहे. (Priyanka Chopra) प्रियंका चोप्रा केवळ अभिनयच नाही तर निर्मिती क्षेत्रातही सक्रिय झाली आहे. विशेष म्हणजे ‘रीसेट’ या चित्रपटात ती अभिनेत्रीबरोबरच निर्मातीची भूमिकाही निभावणार आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट प्रियंकासाठी आणखी खास मानला जात आहे. Priyanka Chopra Upcoming Movie: हॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यासोबत झळकणार प्रियंका चोप्रा; ‘रीसेट’ चित्रपटाची अधिकृत घोषणा या चित्रपटाच्या शूटिंगबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, ‘रीसेट’ चित्रपटाचं शूटिंग ऑगस्ट महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. सर्व्हायवल थ्रिलर प्रकारातील हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार असल्याचं बोललं जात आहे. (Priyanka Chopra Upcoming Movie) प्रियंका चोप्राने गेल्या काही वर्षांत हॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘सिटाडेल’ मालिकेपासून अनेक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समध्ये तिने दमदार कामगिरी केली आहे. नुकताच तिचा ‘सिटाडेल २’ हा सीझन प्रदर्शित झाला असून त्यालाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय प्रियंका दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या मोठ्या बजेटच्या ‘वाराणसी’ या चित्रपटातही काम करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता महेश बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘वाराणसी’ चित्रपटाचं शूटिंग सध्या सुरू असून हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जात आहे. प्रियंकाच्या करिअरकडे पाहिल्यास तिने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास केला आहे. अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही ती स्वतःची छाप सोडताना दिसत आहे. त्यामुळे ‘रीसेट’ या नव्या चित्रपटाकडून तिच्या चाहत्यांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. (Priyanka Chopra Upcoming Movie)