Sonam Kapoor : अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा हे बॉलिवूडमधील सर्वात गोंडस जोडप्यांपैकी एक आहेत. २०२२ मध्ये त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन झाले. सोनम कपूरने मुलाला जन्म दिला. त्यांच नाव वायु असं ठेवण्यात आले. आता सोनम कपूर दुसऱ्यांदा गुडन्यूज देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सोनमने अद्याप तिच्या गरोदरपणाबद्दल कोणतेही संकेत दिले नसले तरी, ती लवकरच अधिकृत पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी सांगू शकते, असे सांगितले जात आहे. खरंतर, पिंकव्हिलाच्या एका रिपोर्टनुसार, ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा गर्भवती असून ती लवकरच याबाबतची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर मे २०१८ मध्ये लग्न केले. त्यानंतर सोनम अनेक कारणांमुळे सतत चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा लग्नाच्या ७ वर्षांनंतर दुसऱ्यांदा पालक क्लबमध्ये सामील होणार आहेत. सोनम आणि आनंद त्यांच्या दुसऱ्या मुलाची अपेक्षा करत आहेत. कपूर आणि आहुजा कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. दोन्ही कुटुंबे त्यांच्या छोट्या पाहुण्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत, अशी माहिती माध्यमांतून मिळत आहे. सोनमच्या कामाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास सोनम कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर तिने ‘रांझणा’ आणि ‘नीरजा’ यांसारख्या हिट चित्रपटात काम केले. त्यानंतरही तिने अनेक दर्जेदार चित्रपटात लक्षवेधी भूमिका साकारलेल्या आहेत. आगामी काही काळात सोनम कपूर अनुजा चौहान यांच्या कादंबरीवर आधारित “बॅटल फॉर बिट्टोरा” मध्ये दिसणार आहे. हेही वाचा : बालिका वधू’ फेम अभिनेत्री अविका गौर अडकली लग्नबंधनात