पुणे – शहरात मागील चोवीस तासांत नवीन 172 करोनाबाधित आढळले असून, बरे झालेल्या 181 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, उपचारादरम्यान 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 6 रुग्ण हे पुण्यातील आहेत.
शहरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 995 इतकी असून त्यापैकी 202 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. शहरात आतापर्यंत 1 लाख 85 हजार 730 बाधित आढळले असून, त्यापैकी 1 लाख 78 हजार 976 रुग्ण बरेही झाले आहेत. तर, 4 हजार 759 रुग्ण मरण पावले आहेत. शहरात मागील चोवीस तासांत 4 हजार 152 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली.