Lonikand Police Station: …त्या लोणीकंद पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई; वकील मारहाण प्रकरण भोवले
Lonikand Police Station: त्या कर्मचाऱ्याची उपायुक्तांच्या आदेशाने मुख्यालयात बदली करण्यात आली

वाघोली : लोणीकंद पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने वकील बांधवास मारहाण केल्याची घटना घडली असल्याचा आरोप काही वकिलांनी केला होता. याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियात व्हायरल झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी या घटनेची चौकशी करून तातडीने पोलीस उपायुक्तांना अहवाल सादर केल्याने त्या कर्मचाऱ्याची उपायुक्तांच्या आदेशाने मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
वकील मारहाण प्रकरणामुळे पुणे परिसरातील वकील वर्गात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल पाठवून योग्य त्या चौकशीची शिफारस केली होती.
त्यांच्या अहवालानंतर वरिष्ठांकडून तातडीने कारवाई करत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस मुख्यालयात अटॅच करण्यात आले असून, या प्रकरणी पुढील विभागीय चौकशी व कारवाई सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून तातडीने कारवाई करण्यात आली असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा:
Uddhav Thackeray: “पक्षाचे मूळ चिन्ह धनुष्यबाण आपल्यालाच मिळेल, नाही तर…”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा





