शिंगणापुरातील बंद गाळ्यासंदर्भात आयुक्तांना कारवाईचे आदेश

आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केला पाठपुरावा

नेवासाफाटा – शिंगणापूर देवस्थानच्या निष्क्रिय विश्वस्त मंडळाच्या गैरकारभारामुळे देवस्थानचे 70 व्यावसायिक गाळे लिलावाअभावी बंद केले आहेत. त्यामुळे देवस्थानचे झालेल्या पाच कोटी रुपयाचे नुकसानाचा प्रश्न आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मंत्रालयात नेला आहे. याप्रश्नी विधी व न्याय राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी धर्मदाय आयुक्तांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

जगप्रसिद्ध शिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ शासनाने सुमारे वर्षापूर्वी बरखास्त केले असून त्यावर सध्या प्रशासकीय व्यवस्था आहे. विश्वस्त मंडळाने धर्मदाय आयुक्ताकडे व्यापारी गाळ्याचा करार 14 जून रोजी संपत असल्याने लिलावाची परवानगी 4 जून 2019 रोजी मागितली होती त्यानुसार परवानगी मिळालेली असतानाही ही देवस्थाने लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी गैरकारभाराचे प्रदर्शन केले आहे.

त्यामुळे या व्यापारी गाळ्यांच्या लिलावाची 14 जून रोजीची प्रक्रिया होऊ शकली नाही आणि ही प्रक्रिया पूर्ण न करताच विश्वस्त मंडळाने सदरच्या 70 व्यापाऱ्यांकडून खाली करून घेतले आहे. त्यामुळे देवस्थानचे सुमारे पाच कोटी रुपयांच्या नुकसानीस हे प्रशासन कारणीभूत ठरले आहे. तसेच या निर्णयामुळे येणाऱ्या भाविकांचे हाल झाले आहेत.

ही सर्व बाब लक्षात घेत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी अधिवेशनादरम्यान नामदार रणजीत पाटील यांच्याकडे विश्वस्त मंडळ विरुद्ध तक्रार केली आहे. या तक्रार अर्जावर नामदार पाटील यांनी ताबडतोब धर्मदाय आयुक्त यांनी चौकशी करावी व कारवाई करावी असे आदेश दिले आहेत.

मंत्रालयाच्या हस्तक्षेपाने शिंगणापूरच्या गाळेधारकांच्या प्रश्न ताबडतोब सुटणार असल्याने गाळेधारकांनी आमदार मुरकुटे यांचे आभार मानले आहेत. शिंगणापूर देवस्थानचे 70 व्यावसायिक गाळे लिलावाअभावी बंद

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.