अनुष्काच्या बॉडीगार्डवर कारवाई; एका चुकीमुळे भरावा लागणार 10 हजार रुपयांचा दंड

मुंबई – बॉलीवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांचा दुचाकीवर प्रवास केल्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील बॉडगार्डसोबत दुचाकीवर प्रवास केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. मात्र या दोघांनी देखील दुचाकीवर प्रवास करताना हेल्मेट घातले नव्हते. यावरून नेटकऱ्यांनी ट्राफिकचे नियम मोडल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर मुंबई पोलिसांनी सेलिब्रिटींच्या बाइक राइडची आणि मोडलेल्या नियमांची दखल घेत त्यांना दंड ठोठावला आहे. अनुष्काचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी अनुष्काच्या बॉडिगार्ड सोनू शेखला १०, ५०० रुपयांचा दंड ठोठावल्याचं समोर आले आहे. हेल्मेटशिवाय बाईक चालविल्याने आणि परवान्याशिवाय वाहन चालविल्याबद्दल हा दंड त्याकडून आकारण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईनंतर नियम सर्वांसाठी सारखेच असल्याचे दाखवून दिले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्मा बॉडीगार्ड सोनू शेखच्या बाईकवर बसून मुंबईच्या रस्त्यावर दिसली होती. तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच अनेक नेटकऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांकडे धाव घेतली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
#AnushkaSharma Criticised For Taking a Ride Without Helmet; Netizens Cite 2018 Video Alleging ‘Hypocrisy’.@MumbaiPolice @MTPHereToHelp #celebrity #RoadSafety #Mumbai #viralvideo
Subscribe to our YouTube page: https://t.co/bP10gHsrFh pic.twitter.com/b3t6Uj9AU7
— UnMuteINDIA (@LetsUnMuteIndia) May 15, 2023
दरम्यान, याआधी अनुष्का नेटफ्लिक्सवरील ‘काला’ या वेबसीरीजमध्ये दिसली होती. आता अनुष्का ‘चकडा एक्सप्रेस’ मध्ये दिसणार आहे. क्रिकेटर झुलन गोस्वामीवर आधारित हा चित्रपट आहे. प्रोसित रॉय यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.





