नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे बुधवारी सकाळी अल्पवयीन शाळकरी मुलीवर अॅसिड हल्ला झाला. या हल्ल्यात मुलगी गंभीररीत्या भाजली. तिला उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिल्लीतील द्वारका भागात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ला करण्यात आला. साडेसातच्या सुमारास सकाळी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यातील शाळांना अनुदानासाठी 1160 कोटींच्या खर्चास मंत्रिमंडळाची मान्यता – मंत्री दीपक केसरकर
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार मुलीचा चेहरा गंभीररित्या भाजला आहे. तिच्या डोळ्यातही अॅसिड घुसले आहे. या प्रकरणाची तक्रार मिळताच पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, अल्पवयीन विद्यार्थिनीवरील हल्ल्याची माहिती समोर येताच दिल्ली महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे.