40 हजारात लाँच झाला दमदार लॅपटॉप, कोणत्याही कामासाठी करता येईल वापर; 64GB रॅमसह मिळतील अनेक फीचर्स

Acer TravelLite TL15-53M Launched | Acer ने भारतीय बाजारात TravelLite TL15-53M लॅपटॉपला लाँच केले आहे. कंपनीने अवघ्या 40 हजार रुपयांच्या बजेटमध्ये या लॅपटॉपला लाँच केले आहे. Acer चा हा लॅपटॉप जनरेशन इंटेल कोर i3, कोर i5 आणि कोर i7 प्रोसेसरसह उपलब्ध आहे. 40 हजारांच्या बजेटमध्ये येणाऱ्या Acer TravelLite TL15-53M लॅपटॉपविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Acer TravelLite TL15-53M ची किंमत
Acer TravelLite TL15-53M ला कंपनीने 3 वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. Intel Core i3-1305U प्रोसेसरसह येणाऱ्या व्हेरिएंटची किंमत 39,490 रुपये आहे. तर Core i5-1334U प्रोसेसरसह येणाऱ्या मॉडेलला खरेदी करण्यासाठी 58,990 रुपये खर्च करावे लागतील. कंपनीने Intel Core i7 प्रोसेसरसह येणाऱ्या व्हेरिएंटच्या किंमतीचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.
Acer TravelLite TL15-53M चे वैशिष्ट्ये
Acer TravelLite TL15-53M लॅपटॉप स्लीक डिझाइनसह येतो. याचे वजन केवळ 1.58 ग्रॅम आहे. ड्यूरेबिलिटीसाठी लॅपटॉपला MIL-STD 810H सर्टिफिकेशन देखील मिळाले आहे. लॅपटॉपला तुम्ही i3, कोर i5 आणि कोर i7 प्रोसेसरसह खरेदी करू शकता. यामध्ये DDR4 आणि DDR5 रॅम आहे. याशिवाय, इनबिल्ट CoPilot बटन देखील कंपनीने दिले आहे.
Acer च्या या लॅपटॉपमध्ये 15.6 इंच एलसीडी बॅकलिट आयपीएस अँटी-ग्लेअर स्क्रीन दिली आहे, जी फुल एचडी रिझोल्यूशन आणि 250 निट्स ब्राइटनेससह येते. यात 64 जीबीपर्यंत (डीडीआर4 आणि डीडीआर5) रॅम आणि 2 टीबीपर्यंत एसएसडी स्टोरेज दिले आहे. लॅपटॉपमध्ये विंडोज 11 होम, विंडोज 11 प्रो आणि लिनक्सचा देखील पर्याय मिळतो.
व्हीडिओ कॉलिंग आणि मीटिंगसाठी यात एचडी वेब कॅमेरा मिळतो. लॅपटॉपमध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारी 54.5 Whr 3-cell लिथियम-आयन बॅटरी दिली आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी यूएसबी 3.2 जेन 2 टाइप-सी पोर्ट, एक यूएसबी टाइप-सी पोर्ट, तीन यूएसबी 3.2 टाइप-ए पोर्ट आणि एक एचडीएमआई पोर्ट दिले आहे. तसेच, वाय-फाय 6 आणि ब्लूटूथ 5.2 चा सपोर्ट मिळतो. दमदार साउंडसाठी यात स्टीरियो स्पीकर्स मिळतील.



