15 हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला Acer चा शानदार लॅपटॉप, विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयोगी, पाहा फीचर्स

Acer Aspire 3 (2025) Launched: तुम्ही जर 15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. Acer ने याच बजेटमध्ये भारतीय बाजारात नवीन लॅपटॉप Aspire 3 (2025) ला लाँच केले आहे. या लॅपटॉपला खास विद्यार्थ्यांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. Acer Aspire 3 (2025) च्या किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया.
Acer Aspire 3 (2025) चे फीचर्स
नवीन Acer Aspire 3 मध्ये 11.6 इंच HD Acer ComfyView LED बॅकलिट LCD डिस्प्ले देण्यात आला असून, यामुळे यूजर्सला ग्लेयर-फ्री व्यूइंग एक्सपीरियन्स मिळतो. Acer चा हा लॅपटॉप Intel Celeron N4500 प्रोसेसर Intel HD ग्राफिक्ससह येतो. यामध्ये 8GB DDR4 रॅम देण्यात आली आहे. रॅमला 16 जीबीपर्यंत अपग्रेड करू शकता.
स्टोरेजसाठी कंपनीने यामध्ये 128GB ते 1TB पर्यंतचे व्हेरिएंट्स दिले आहे. यात 38Wh Li-ion बॅटरी देण्यात आली असून, यामुळे अनेक तास लॅपटॉप वापरू शकता. याशिवाय, 720p HD वेबकॅम आणि ड्युअल स्टीरियो स्पीकर्स देखील यात देण्यात आले आहेत. यामुळे ऑफिस मीटिंग्स आणि ऑनलाइन क्लासेससाठी फायदा होईल.
कनेक्टिव्हिटीसाठी Acer Aspire 3 मध्ये USB 3.2 Gen 1 पोर्ट्स, एक USB Type-C पोर्ट आणि एक HDMI पोर्टसह microSD card रीडर दिला आहे.
Acer Aspire 3 (2025) ची किंमत
ग्राहक नवीन Acer Aspire 3 (2025) लॅपटॉपला ई-कॉमर्स साइट Flipkart वरून खरेदी करू शकता. लॅपटॉप 128GB, 256GB आणि 512GB या स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. याची सुरुवाती किंमत 15,990 रुपये आहे. तुम्ही 24 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत या लॅपटॉपला 14,990 रुपयात खरेदी करू शकता.




