nagar | वेठेकरवाडी परिसरात दरोड्याचे तयारीत असलेले आरोपी जेरबंद

नगर, (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील वेठेकरवाडी परिसरात दरोड्याचे तयारीतील असलेले तिघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख ४७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मात्र यातील आनखी 4 व्यक्ती अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आदिक आजगन काळे, समीर आदिक काळे, (दोन्ही रा. म्हसणे, ता. पारनेर), आकाश रवींद्र काळे (वय 21, रा. गटेवाडी, ता. पारनेर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे पळुन गेलेल्या साथीदारांची नावे विचारली असता त्यांनी पळुन गेलेल्यामध्ये वारुद भास्कर चव्हाण (फरार), 5) कोक्या भास्कर चव्हाण (फरार), 6) सतिष भास्कर चव्हाण (फरार), 7) अजय संतोष भोसले (फरार), (सर्व रा. कोळगांव, ता. श्रीगोंदा) व 8) राहुल अर्पण भोसले (फरार), रा. म्हसणे, ता. पारनेर असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या संशयीतांची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडती व कब्जात १ कत्ती, १ कटावणी, १ सुरा, मिरचीपुड, २ मोबाईल फोन व 1 दुचाकी असा एकुण १ लाख ४७ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरोन नेला. याबाबत रवींद्र तुकाराम घुंगासे यांनी याबात फिर्याद दिली आहे.
आरोपी आदिक काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द खुन, खुनासह दरोडा, दरोडा, घरफोडी व गंभीर दुखापत असे गंभीर स्वरुपाचे एकुण ११ गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने कारवाई केली.





