गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदे गटात प्रवेश; दिली ‘ही’ जबाबदारी

Shrikant Pangarkar In Shiv Sena | पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर याने शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश केला आहे. शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या उपस्थितीत जालन्यात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
विशेष म्हणजे शिंदे गटात प्रवेश करताच श्रीकांत पांगारकरवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पांगारकरची जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्तीही करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. Shrikant Pangarkar In Shiv Sena |
2017 मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील त्यांच्या राहत्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी एसआयटीने अमोल काळे नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. श्रीकांत पांगारकर हा अमोल काळेच्या संपर्कात होता, हे एसआयटीच्या तपासात समोर आले.
त्यानंतर 2018 मध्ये श्रीकांत पांगारकरला अटक करण्यात आली होती. पण 4 सप्टेंबर 2024 रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने श्रीकांत पांगारकरला जामीन मंजूर केला. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातही श्रीकांत पांगारकरचा सहभाग होता.
कोण आहे श्रीकांत पांगारकर? Shrikant Pangarkar In Shiv Sena |
श्रीकांत पांगारकर शिवसेनेचा माजी नगरसेवक होता. तर त्याचे वडील जगन्नाथ पांगारकर हे भाजपचे माजी नगरसेवक होते. 2001 ते 2010 मध्ये तो शिवसेनेचा नगरसेवक होता. 2011 मध्ये त्याने शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आणि हिंदू जनजागृती समितीचा पदाधिकारी म्हणून काम केले.
हेही वाचा:





