आमदार तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात
Updated On:

यवत – परांडा विधानसभेचे आमदार तानाजी सावंत शनिवारी (दि. 5) रात्री बाराच्या सुमारास आपली टोयोटा गाडी क्रं. (एमएच 12 आरएफ 6000) मधून उस्मानाबाद येथून सोलापुर – पुणे महामार्गवरून पुण्याकडे निघाले होते. दरम्यान गाडी वरवंड (ता. दौंड) येथे आली असता कंटेनरची धडक बसून गाडीचा अपघात झाला. अपघातात कोणतीही जीवितहाणी झालेली नाही. यामध्ये कारचे नुकसान झाले आहे.
कंटेनर चालक रोहित देविदास वाघमोडे (रा. रेवन, सिध्देश्वर नगर, होटगी रोड, सोलापूर) यांचेविरुद्ध सावंत यांचे चालक सोनबा शंकर देवकाते यांच्या फिर्यादीवरून यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक इंगवले करीत आहेत.





