पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाने 5 जणांना चिरडले; तीन ठार
Updated On:

पुणे – पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ गावच्या हद्दीमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले. अपघातातील मृतांमध्ये एका महिलेसह दोन लहान मुलांचा समावेश आहे.
ही दुर्घटना पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पाच जणांना चिरडल्याने घडली. या वाहनाच्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू, तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही गाडी पुणे-सोलापूर महामार्गावरील पुण्याकडून सोलापूर दिशेने चालले होते. याच दरम्यान महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाची पाच जणांना धडक दिली.





