Accident News : नांदेडमध्ये बस-दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू
Updated On:

नांदेड – बस आणि दुचाकीच्या अपघाताची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकीचालक आणि 3 वर्षाची चिमुकली सुदैवाने बचावली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास हा अपघात घडला आहे.
उदगीरकडे प्रवासी घेऊन जाणारी एसटी आणि दुचाकीची हानेगाव जवळील औराद वझर कॉर्नरवर समोरासमोर धडक झाली. यात दुचाकी थेट एसटीखाली अडकल्याने दुचाकीवरील चौघेजण गंभीर जखमी झाले.
जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान दोन वृद्धांचा मृत्यू झाला. दुचाकीचालक आणि तीन वर्षाची चिमुकली बचावली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.





