छत्रपती संभाजीनगर : पिनाकेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन परतताना भाविकांचा ट्रॅक्टर पिनाकेश्वर डोंगराच्या घाटातील खोल दरीत कोसळल्याची भीषण घटना घडली आहे. या अपघातात दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला असून, 24 जण जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 27 भाविकांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पिनाकेश्वर येथे महादेवाच्या दर्शनासाठी गेला होता. दर्शनानंतर परतताना नागमोडी वळणावर घाट उतरत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, आणि ट्रॅक्टर खोल दरीत कोसळला. या पिकअपमध्ये प्रामुख्याने महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना जवळील रुग्णालयात दाखल केले. सध्या छत्रपती संभाजीनगर, शिऊर बंगला आणि बोलठाण येथील खाजगी रुग्णालयांमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. जखमींची नावे खालीलप्रमाणे स्वाती पारसनाथ राऊत, मनीषा पारसनाथ राऊत, बालीका दिलीप गायके, वर्षा आप्पा राऊत, कल्याणी राजेंद्र कवडे, साई विजय कवडे, प्रतिक्षा विजय कवडे, आदित्य योगेश कवडे, प्रगती सोमनाथ कवडे, दिलीप डिगंबर गायके, योगेश अशोक कवडे, पंकज गोरखनाथ कवडे, विजय दादा कवडे, पारसनाथ राऊत, माऊ दिलीप गायके, चिऊ दिलीप गायके, सुवर्णा संदीप गायके, मावडी संदीप गायके, चेतन प्रकाश कवडे, प्रतिक्षा प्रकाश कवडे, माया प्रकाश कवडे, आप्पा सोपान राऊत, श्रावणी आप्पा राऊत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी मदत केली. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.