Accident news : बीडमध्ये भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी
Updated On:

Accident news – बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर-हातोला मार्गावर भीषण अपघात घडला आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात लिमगाव पाटीजवळ शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला.
हा अपघात इतका भीषण होता की यात एक जण जागीच ठार झाला, तर दोघांचा उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना मृत्यू झाला. या अपघातात अभय सतीश चव्हाण (रा. बर्दापूर) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
तर समोरून येणा-या दुचाकीवरील फारूख रहिमखाँ पठाण आणि नासीर खाजामियाँ शेख (दोघेही रा. पानगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लातूरकडे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातात ऋषिकेश अशोक चव्हाण हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.





