Accident News : धक्कादायक ! त्र्यंबकेश्वरवरून परतताना भाविकांच्या कारचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू
मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील आटगाव येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला इर्टिगा कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident News) इर्टीगा कारमधील चार जणांचा मृत्यू झाला.

Accident News : मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील आटगाव येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला इर्टिगा कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident News) इर्टीगा कारमधील चार जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. श्रीराम जैस्वाल, आयुष जैस्वाल, लाडो जैस्वाल आणि सुरज जैस्वाल अशी मृतांची नावे आहेत.
जखमींना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, इर्टिगा कारमधील प्रवासी त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते.
आटगाव परिसरात आल्यानंतर इर्टिगा कारने ट्रकला जोरदार धडक (Accident News) दिली. धडक इतकी भीषण होती की, या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
तर, सुभी जैस्वाल, शिवम जैस्वाल, हाशिक जैस्वाल, सुनीता जैस्वाल, राधिका जैस्वाल आणि सतीश जैस्वाल हे जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमींना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल (Accident News) करण्यात आले. इर्टिगा कार जोगेश्वरी येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या संपूर्ण घटनेचा तपास सध्या पोलीस घेत आहेत.





