Accident News : जालन्यात ट्रक उलटून एकाचा मृत्यू
Updated On:

जालना – साकत घाटातील वळणावर रविवारी सकाळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी होवून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सुमित राठोड असे मृताचे नाव आहे.
घटनेबाबत माहिती अशी, जालना जिल्ह्यातील चिखली येथून मका घेवून पुण्याकडे जात असलेला ट्रक रविवारी सकाळी आठ वाजता जामखेड जवळील साकत घाटामध्ये पलटी झाला.
दरम्यान, किन्नरने उडी मारल्याने ट्रक खाली दबून त्याचा मृत्यू झाला. त्याला जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असतान वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज शिंदे यांनी तपासणी करून मृत घोषित केले.





