Accident News : महाराष्ट्र हादरला ! देवदर्शनावरून परतताना भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू
संपूर्ण महाराष्ट्र राज्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी (Accident News) घटना सोलापूर जिल्ह्यातून समोर आली आहे.

Accident News : संपूर्ण महाराष्ट्र राज्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी (Accident News) घटना सोलापूर जिल्ह्यातून समोर आली आहे. माळशिरस तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांनी भरलेले पिकअप वाहन थेट रस्त्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळले.
या अत्यंत दुर्दैवी अपघातात (Accident News) तब्बल १४ जणांचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत भाविक पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; विहिरीला कठडे नसल्याने अनर्थ
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रांजणी गावातील भाविक सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील प्रसिद्ध सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन आनंदाने आपल्या गावाकडे परतत असताना, माळशिरस जवळील तांदूळवाडी गावाच्या शिवारात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
रस्त्याच्या अगदी कडेला असलेली ही विहीर पाण्याने तुडुंब भरलेली होती आणि विशेष म्हणजे या विहिरीला कोणतेही संरक्षक कठडे नव्हते.नियंत्रण सुटलेले पिकअप वाहन थेट या खोल विहिरीत जाऊन कोसळले.
विहीर भरलेली असल्याने वाहनातील लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि 8 जणांचा बुडून अंत झाला. या भीषण अपघातातून केवळ 6 जण सुदैवाने बचावले आहेत.
मृतांमध्ये ४ लहान मुले आणि ४ महिलांचा समावेश; गावात शोककळा
या हृदयद्रावक अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले. विहिरीतून आतापर्यंत ८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मृतांमध्ये ४ निष्पाप लहान मुले आणि ४ महिलांचा समावेश असल्याने परिसरातून अत्यंत हळहळ व्यक्त होत आहे. सध्या रांजणी गावावर संपूर्ण शोककळा पसरली असून नातेवाईकांनी एकच टाहो फोडला आहे.
आमदार घटनास्थळी; पालकमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश
अपघाताचे वृत्त समजताच माळशिरसचे आमदार उत्तम जाणकर यांनी तातडीने घटनास्थळाकडे (Accident News) धाव घेतली असून ते मदतकार्याची पाहणी करत आहेत. विहिरीभोवती स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.
दरम्यान, या भीषण घटनेवर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तीव्र दुःख व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “हा अपघात अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि रस्त्या कडेला असलेल्या विहिरीला कठडे का नव्हते, यासह सर्व बाजू तपासून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे. सध्या पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने विहिरीतून उर्वरित मृतदेह आणि वाहन बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.






