बेगुसराय : बिहारमधील बेगुसरायहून दिल्लीला जाणाऱ्या एका खाजगी स्लीपर बसला (बस क्र. युपी17 एटी 6372) लखनऊच्या किसान पथावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग लागल्यानंतरही बस सुमारे एक किलोमीटर धावतच राहिली. चालक आणि वाहक ताबडतोब घटनास्थळावरून पसार झाले. पोलिस आणि सामान्य लोकांच्या मदतीने काच फोडून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाने सुमारे अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. या घटनेत पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आगीत भाजलेल्या प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मृतांपैकी एक वगळता इतर चार जणांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये दोन मुले, दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. अपघाताची वेळ पहाटे पाचच्या सुमारास असल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी बसमध्ये सर्वजण झोपले होते. एका माणसाशिवाय इतर सर्व प्रवाशांची ओळख पटली आहे. आग लागल्यानंतर बस काही काळ जळत्या स्थितीत धावत राहिली. आगीमुळे मुख्य गेट जाम झाले. ज्यांना इतर मार्गांनी पळून जाता आले ते वाचले. पीजीआय कल्लीजवळील किसान पथावर हा अपघात झाला. स्थानिक लोकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. पोलिस तपासात असे दिसून आले की बसचा आपत्कालीन दरवाजा उघडला नाही आणि त्यामुळे मागे बसलेले लोक बसमध्ये अडकले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की आग इतकी भीषण होती की त्याच्या ज्वाळा 1 किमी अंतरापर्यंत दिसत होत्या.