‘अपघातमुक्त भारत’ हीच विनायक मेटेंना खरी श्रद्धांजली
Updated On:

मुंबई – शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे आज भीषण अपघातात निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी विनायक मेटेंच्या दुर्दैवी निधनावर शोक व्यक्त केला आहे.
नितीन गडकरी म्हणाले,’रस्त्यावर अनेक अपघात होत असतात. पण आता प्रत्येकाने संवेदनशील नागरिक बनले पाहिजे. या अपघाताचं नेमकं कारण माहिती नाही. पण आपल्याला भारताला अपघातमुक्त केलं पाहिजे आणि हीच विनायक मेटे यांना खरी श्रद्धांजली ठरेल.’ अशी प्रतिक्रीया मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.





