शिरूरमध्ये बांधकामस्थळी दुर्घटना; दुसऱ्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू
Updated On:

शिरूर – शिरूर येथील थापेमळा परिसरात गंगा एज्युकेशन सोसायटीच्या इमारतीच्या बांधकामस्थळी २२ एप्रिल रोजी दुपारी २:२० वाजता भीषण अपघात घडला. दुसऱ्या मजल्यावर प्लास्टरचे काम करताना तोल जाऊन मजूर अखिलेश कुमार (वय ४५, मूळ रा. मुन्दिपुर, सिवान, बिहार) खाली पडले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने श्री गणेशा हॉस्पिटल, शिरूर येथे दाखल केले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अखिलेश सध्या बाबुराव नगर, शिरूर येथे राहत होते. हे काम लेबर कॉन्ट्रॅक्टर टुनटुन पंडित (वय ३३) यांच्या देखरेखीखाली सुरू होते. शिरूर पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलीस हवालदार खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे कामगार वर्गात हळहळ व्यक्त होत असून, बांधकामस्थळावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.





