भाजप खासदाराची अभद्र टिपणी; म्हणाले, “ओवैसींची दाढी…”

निझामाबाद – देशभरामध्ये सध्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात व समर्थनार्थ अशी परस्पर विरोधी आंदोलनं सुरु असून दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात आक्षेपार्ह्य भाषेत वक्तव्य केली जात आहेत. अशातच आज भाजपचे निझामाबाद येथील खासदार धर्मपुरी अरविंद यांनी असादुद्दीन ओवैसी यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेमध्ये टिपणी केली असून ओवैसी यांना थेट क्रेनला उलटं लट्कवण्याची धमकीच त्यांनी दिली आहे. ते म्हणतात, “मी ओवैसींना उलट लटकवून त्यांची दाढी कापून ती तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना (चंद्रशेखर राव) चिकटवेण. असं केल्यानं ओवैसींच्या दाढीचे प्रमोशन होईल.”
यापूर्वीही खासदार धर्मपुरी अरविंद यांनी अनेकदा ओवैसी यांच्यावर निशाणा साधला असून ओवैसी पाकिस्तान व बांगलादेशातून होणारी घुसखोरी बंद होऊ नये यासाठी आंदोलन करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्या ओवैसींवर राष्ट्रद्रोहाचा खटला भरायला हवा अशी मागणी त्यांनी केली.
BJP Nizamabad MP Dharmapuri Arvind: I warn you(Asaduddin Owaisi) that I will hang you upside down to a crane and shave your beard. I will give promotion to your beard by sticking it to the Chief Minister. #Telangana (3.1.20) pic.twitter.com/9Tpy43Qb4P
— ANI (@ANI) January 4, 2020





