पिंपरी | पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी महिलेशी गैरवर्तन
Updated On:

पिंपरी, (प्रतिनिधी) – महिलेच्या मुलाला मारहाण केल्याची तक्रार मागे घेण्यासाठी आरोपीने महिलेशी गैरवर्तन केले. हा प्रकार 11 मार्च रोजी भूमकर वस्ती वाकडे येथे घडला. संदीप बबन मुंडे (वय 38, रा. भुमकर वस्ती, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी पीडित 37 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला घरी असताना आरोपी मुंडे हा कटर आणि लाकडी दांडके घेऊन आला. त्याने फिर्यादीला धक्का देत खिडकी उघडली.
तसेच जीवे मारण्याची धमकी देत शिवगाळ केली. आरोपीने फिर्यादी यांच्या मुलाला यापूर्वी मारहाण केली होती. त्याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी आरोपीने फिर्यादीवर दबाव आणून शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच फिर्यादी सोबत गैरवर्तन करत विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.





