Pune | शहरासाठी मुबलक पाणीसाठा

पुणे, – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांत मिळून एकूण पाणीसाठा 26.86 टीएमसी म्हणजे 92.13 टक्के इतका आहे. मागील वर्षाच्या तुलनेत खडकवासला प्रकल्पात यंदा 1.25 टीएमसी इतका जादा पाणीसाठा आहे.
खडकवासला प्रकल्पात खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांचा समावेश होतो. या धरणांतून पुणे शहराला पिण्यासाठी तर ग्रामीण भागाला कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडले जाते. त्यामुळे या धरणांत किती पाणीसाठा शिल्लक आहे. याकडे सर्वांचेच लक्ष असते. यंदा चांगला पाऊस झाल्याने ही चारही धरणे 100 टक्के भरली. तसेच, परतीचा पाऊस सुद्धा चांगला झाल्याने धरणांमध्ये धरणांत समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे.
धरणाचे नाव – पाणीसाठा – टक्के
टेमघर – 2.77 टीएमसी – 74.76 टक्के
वरसगाव – 12.53 टीएमसी – 97.75 टक्के
पानशेत – 10.21 टीएमसी – 95.87 टक्के
खडकवासला – 1.34 टीएमसी – 68.11 टक्के





