औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्या अबू आझमींना कोर्टाकडून मोठा दिलासा; अटकेपासून मिळाले सरंक्षण, पण…

Abu Azami | समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना औरंगजेबाचे कौतुक करणं चांगलंच महागात पडलं आहे. अबू आझमींनी औरंगजेब ‘उत्तम प्रशासक होता’, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून राज्यभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. याचे पडसाद विधानसभेतही पाहायला मिळाले आणि त्यांना विधानसभेतून या अर्थसंकल्पीय सत्रासाठी निलंबित करण्यात आले. त्यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आले होते.
त्यानुसार, वादग्रस्त विधानासाठी मुंबई दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात अबू आझमींनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. हा अर्ज कोर्टाने स्वीकारला असून 20 हजार रुपयांच्या बाँडवर अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच 12,13 आणि 15 मार्चला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देशही आझमी यांना दिले आहेत.
विधानसभेत अबू आझमींच्या वक्तव्यावरून गोंधळ
दरम्यान, अबू आझमी यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभेत अबू आझमींच्या वक्तव्यावरून गोंधळ घातला होता. राजकीय वर्तुळात अबू आझमींवर टीकेची झोड उठली. अबू आझमींनी माफी मागावी, अशी मागणी देखील केली जात होती. यानंतर विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी हे निलंबित आमदार असणार असल्याचे सांगण्यात आले. Abu Azami |
अबू आझमी काय म्हणाले होते?
अबू आझमी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार आहेत. अबू आझमी यांनी विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला औरंगजेबाचे कौतुक करत वादग्रस्त वक्तव्य केले होते. औ”रंगजेबाबत चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. त्याची प्रतिमा सध्या देशात चुकीच्या पद्धतीनं रंगवली जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. त्यांच्या काळात भारत देशाची ओळख ‘सोने की चिडिया’अशी होती. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी नव्हती,” असे विधान अबू आझमींनी केले होते. Abu Azami |
हेही वाचा :





