फवाद खानचे 9 वर्षानंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक; ‘या’ अभिनेत्रीसोबत झळकणार

ABIR GULAAL TEASER | पाकिस्तानी अभिनेता फवाद खान बॉलीवूडमध्ये दमदाररित्या कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे. नुकताच त्याच्या ‘अबीर गुलाल’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. यात तो अभिनेत्री वाणी कपूरसोबत पाहायला मिळणार आहे.
वाणी कपूरने ‘अबीर गुलाल’चा पहिला प्रोमो शेअर केला आहे. या पोस्टसोबत तिने लिहिले, “प्रतीक्षा संपली. अबीर गुलाल मधून मी आणि फवाद मोठ्या पडद्यावर लव्हस्टोरी घेऊन येत आहोत. ९ मे रोजी सिनेमा प्रदर्शित होत आहे.” या टीझरची सुरूवात फवाद खानपासून होते. ज्यात कुमार सानूचं ‘कुछ ना कहो’ गाणं बॅकग्राऊंडला ऐकू येतं.
तर वाणी कपूर त्याच्या साइड सीटवर बसलेली दिसत आहे. याद्वारे चित्रपटाचा छोटा टीझर कव्हर केला आहे. या दोघांचीही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.
दरम्यान, भारतात पाकिस्तानी कलाकारांना बंदी केल्यापासून फवाद खानही हिंदी सिनेसृष्टीतून गायब झाला. त्याने ‘ए दिल है मुश्किल’, ‘खूबसूरत’, ‘कपूर अँड सन्स’ सिनेमांमध्ये काम केलं होतं. आता 9 वर्षांनंतर चाहते फवाद खानच्या भेटीस येणार आहे. फवाद खानचा शेवटचा हिंदी चित्रपट 2016 मध्ये रिलीज झाला होता.
‘अबीर गुलाल’ सिनेमाची निर्मिती विवेक अग्रवाल, अवंतिका हरी, राकेश सिप्पी यांनी केलं आहे. तर आरती बागडी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ABIR GULAAL TEASER |
हेही वाचा:





