RCB vs SRH : अभिषेकच्या षटकाराने स्टेडियममध्ये तोडफोड, ‘या’ खेळाडूंना मिळणार ५ लाखांचे मोफत किट

Abhishek Sharma’s Six Breaks Tata Curvv Glass in RCB vs SRH : आयपीएल २०२५ चा ६५ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. सनरायझर्स हैदराबादचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी डावाच्या सुरुवातीलाच मोठे फटके मारण्यास सुरुवात केली. या दरम्यान अभिषेकने एक असा षटकार मारला, ज्यामुळे स्टेडियममधील टाटा कर्व्ह कारची काच फुटली. यासह त्याने पाच लाखाचा फायदा करुन दिला.
या सामन्यात अभिषेक शर्माने डावाच्या सुरुवातीपासूनच स्फोटक फलंदाजी केली आणि मैदानाच्या चौफेर फटके मारले. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारने दुसरे षटक टाकले. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अभिषेकने शानदार षटकार मारला. हा षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि थेट स्टेडियममध्ये उभ्या असलेल्या टाटा कर्व्ह कारच्या काचेवर आदळला, ज्यामुळे कारच्या काचेला तडे गेले. यासह त्याने पाच लाखाचा फायदा करुन दिला. यासह त्याने पाच लाखाचा फायदा करुन दिला, कसा ते जाणून घेऊया.
अभिषेक शर्माने मारला पाच लाखांचा षटकार?
#AbhishekSharma starts with fireworks! Sends it sailing for six!
Will #RCB find a way to contain the onslaught in their #Race2Top2?
Watch the LIVE Action 👉 https://t.co/SI62QyCPRK#IPLOnJioStar 👉 #RCBvSRH | LIVE NOW on Star Sports Network & JioHotstar pic.twitter.com/fQJxgRorEu
— Star Sports (@StarSportsIndia) May 23, 2025
आयपीएल २०२५ च्या हंगामाला सुरूवात होण्यापूर्वी, टाटा मोटर्सने घोषणा केली होती की, जर एखाद्या फलंदाजाने चेंडू थेट स्टेडियममध्ये असलेल्या त्यांच्या टाटा कर्व्ह कारवर मारला, ते ग्रामीण भागातील क्रिकेटच्या विकासासाठी तेथील होतकरु मुलांना ५ लाख रुपयांचे क्रिकेट किट वाटतील. आता अभिषेकचे हा षठाक टाटा मोटर्सच्या विशेष उपक्रमाचा भाग बनला आहेत. त्याने सामन्यात १७ चेंडूत ३ चौकार आणि तीन षटकार मारत ३४ धावा केल्या.
सामन्याबद्दल बोलायचे, तर इशान किशनच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने आरसीबीसमोर २३२ धावांचे लक्ष्य ठेवले. इशानने ४८ चेंडूत सात चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद ९४ धावा केल्या, ज्यामुळे हैदराबादचा संघ २० षटकांत सहा गडी बाद २३१ धावा करण्यात यशस्वी झाला. आरसीबीसाठी रोमारियो शेफर्डने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.





