Abhishek Sharma Record : अभिषेक शर्माने रचला इतिहास! सीएसकेविरुद्ध अवघ्या इतक्या चेंडूत अर्धशतक ठोकत मोडला स्वत:चा रेकॉर्ड
Abhishek Sharma Record : सनरायझर्स हैदराबादचा युवा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा याने चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) गोलंदाजांचा अक्षरशः पालापाचोळा करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे.

Abhishek Sharma Fastest Fifty Record for SRH : आयपीएल २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) फलंदाजांनी पुन्हा एकदा आक्रमकतेची नवी व्याख्या लिहिली आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, जो अभिषेक शर्माने पूर्णपणे चुकीचा ठरवला. डावातील पाचव्या षटकात अभिषेकने मॅथ्यू शॉर्टला लक्ष्य करत सलग तीन चौकार आणि दोन गगनचुंबी षटकार खेचले. यासह त्याने केवळ १५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करून नवा इतिहास रचला.
स्वतःचाच विक्रम काढला मोडीत –
अभिषेक शर्माने याआधी मुंबई इंडियन्सविरुद्ध १६ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. आता १५ चेंडूत हा टप्पा गाठून तो हैदराबादसाठी सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा खेळाडू ठरला आहे. ट्रॅव्हिस हेडनेही दोनदा १६ चेंडूत ही किमया साधली होती, पण अभिषेकने आता या सर्वांना मागे टाकले आहे. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये मुंबई (MI) आणि चेन्नई (CSK) या दोन्ही तगड्या संघांविरुद्ध २० पेक्षा कमी चेंडूत अर्धशतक ठोकणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.
15-ball FIFTY 🤯
Abhishek Sharma show has begun in Hyderabad 🔥
Updates ▶️ https://t.co/uJG04r8iXD #TATAIPL | #KhelBindaas | #SRHvCSK | @SunRisers | @OfficialAbhi04 pic.twitter.com/SODxGeAAN0
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2026
दोन चेंडूत दोन मोठे धक्के –
अभिषेकने २२ चेंडूत ५९ धावांची खेळी करून बाद होण्यापूर्वी हैदराबादचा पाया भक्कम केला होता. मात्र, सहाव्या षटकात ट्रॅव्हिस हेड (२३) बाद झाला आणि त्याच्या पुढच्याच चेंडूवर कर्णधार इशान किशन शून्यावर बाद झाल्याने हैदराबादची धावगती काहीशी मंदावली.
हेही वाचा – RCB vs DC : दिल्ली कॅपिटल्सचा शेवटच्या षटकात आरसीबीवर चित्त थरारक विजय
हैदराबादने चेन्नईसमोर ठेवले १९५ धावांचे लक्ष्य –
सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर हैदराबादने २० षटकांत नऊ गडी गमावून १९४ धावा केल्या. सीएसकेकडून अंशुल कंबोज आणि जेमी ओव्हरटन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतले, तर मुकेश चौधरीने दोन विकेट्स घेतले. गुर्जपनीत सिंगनेही एक विकेट्स घेतली.





