IND vs AUS : अभिषेक शर्माने मेलबर्नमध्ये इतिहास रचला! मोडला मोहम्मद रिझवानचा मोठा विक्रम

Abhishek Sharma Break Mohammad Rizwan Record : मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजीची जबाबदारी अभिषेक शर्माने एकट्याने सांभाळली. अभिषेक वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले आणि भारतीय संघाचा डाव १८.५ षटकांत केवळ १२५ धावांवर आटोपला. अभिषेकने ३७ चेंडूंत ६८ धावा फटकावल्या, ज्यात ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. या खणखणीत खेळीच्या बळावर त्याने पाकिस्तानच्या यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवानचा मोठा विक्रम मोडला.
एका वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणारा सलामीवीर ठरला –
अभिषेक शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न टी-२० सामन्यात त्याने दुसरा षटकार लगावताच, पूर्ण सदस्य संघांच्या सलामीवीरांमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावे केला. याआधी हा विक्रम पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानच्या नावावर होता, ज्याने २०२१ मध्ये ४२ षटकार ठोकले होते. अभिषेकने २०२५ मध्ये आतापर्यंत ४३ षटकार लगावून रिझवानला मागे टाकले.
FIFTY!
Abhishek Sharma has been at it from the word go.
He brings up a brilliant half-century off just 23 deliveries.
His 6th in T20Is 🔥🔥
Live – https://t.co/ereIn74bmc #TeamIndia #AUSvIND #2ndT20I pic.twitter.com/5lt8x71Tmr
— BCCI (@BCCI) October 31, 2025
पूर्ण सदस्य संघांच्या सलामीवीरांमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू :
- अभिषेक शर्मा (भारत) – ४३ षटकार, २०२५
- मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) – ४२ षटकार, २०२१
- मार्टिन गुप्टिल (न्यूझीलंड) – ४१ षटकार, २०२१
- एविन लुईस (वेस्ट इंडीज) – ३७ षटकार, २०२१
- कॉलिन मुनरो (न्यूझीलंड) – ३५ षटकार, २०१८
हेही वाचा – Jemimah Rodrigues : जेमिमाचं विजयानंतर बेभान ‘गिटार’ सेलिब्रेशन! VIDEO होतोय व्हायरल
१००० धावांपासून केवळ ६४ धावा दूर –
अभिषेक शर्माने आतापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये २६ सामने खेळले असून, २५ डावांमध्ये त्याने ३७.४४च्या सरासरीने ९३६ धावा केल्या आहेत. यात २ शतके आणि ६ अर्धशतके समाविष्ट आहेत. त्याला १००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त ६४ धावांची गरज आहे. पुढील सामन्यात हे साधले तर तो टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये १००० धावा पूर्ण करणारा सर्वात जलद भारतीय फलंदाज ठरेल.





